प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्हात लंम्पी आजारावरील लस उपलब्ध करून देण्याची किसान युवा क्रांती संघटनेनं मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य राजस्थानमध्ये हजारोंच्या संख्येने जनावरांना लंम्पी आजाराने ग्रासलेले आहे. त्याचप्रमाणे जनावरांचा मृत्यू दर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्र राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये लंम्पी या आजाराने ग्रासलेले जनावरे आढळून आले आहेत. या आजारावरील लस् महाराष्ट्र सरकारने तसेच राज्याचे विद्यमान महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र राज्यांमध्ये विशेष करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लंम्पी या आजारावरील लस उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ आपल्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबवावी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा आणि जनावरांना गोचीड निर्मूलन करिता लसीकरण करून घ्यावे व या आजाराच्या प्रादुर्भाव मधील व्यक्ती आपल्या गोठ्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी अशी किसान युवा क्रांती संघटना अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष श्री सिताराम पानसरे सर यांनी आज केली.
