जनतेज न्युज

अल्पसंख्याक सिख समाजा वरती झालेले गुन्हे मागे घ्या; सिख बांधवांची मागणी

प्रतिनिधी, नांदेड : हल्ला मोहल्ला कार्यक्रमादरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांनी एका पोलिसावरती हल्ला केला होता पण पोलीस प्रशासनाने अडीचशे ते तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे मागे घ्यावे यासाठी सिख बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे, की मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या युवकांवरती झालेले गुन्हे हे राज्य शासनाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच पार्श्वभूमीवर नांदेड मधील घडलेल्या घटने संदर्भात राज्य शासनाने विचार करावा व जे निर्दोष आहेत अशा लोकांवरचे गुन्हे मागे घ्यावे.