प्रतिनिधी, अमरावती : प्रसिद्ध गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा ‘शब्द सुरांची भावयात्रा’ हा गझल गायनाचा कार्यक्रम अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे काल रात्री पार पडला,प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाला विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांची विशेष उपस्थिती होती,कोरोनाच्या काळानंतर गझलकार भीमराव पांचाळे यांची ही पहिलीच मोठी मैफल होती. त्यामुळे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, गझलप्रेमी, रसिक नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घेतला.
