प्रतिनिधी, अमरावती : अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे, या घटनेनंतर अमरावती शहरात आमदार रवी राणा यांनी पुन्हा पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केलेत,दंर आठवड्याला खुनाच्या हत्या होत आहे आता त्यामुळे पोलीस आयुक्त ह्या अमरावती सांभाळन्यात फेल झाल्या आहेत, त्यांचा गुन्हेगारावर वचक राहला नाही अमरावतीत कायदा व सुव्यवस्था राहली नाही असा आरोप रवी राणा यांनी केला त्यामुळे मी या संदर्भात गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे अशी माहिती रवी राणा यांनी दिली.
