जनतेज न्युज

अमरावतीत पुन्हा आंतरधर्मीय विवाह प्रकरण समोर ; पीडित तरुणीच बळजबरीने लग्न लावले, अखेर सहा महिन्यानंतर कुटुंबीयांनी आणले परत

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यात लव जिहाद आंतरधर्मीय विवाहाचे रोज नवीन प्रकरण समोर येत आहे,गेल्या सहा महिन्यापूर्वी मेळघाटातील धारणी येथील 23 वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून तिला हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला,तर या तरुणीला जीवे मारन्याच्या धमक्या देऊन तिच्याशी बळजबरीने हैदराबाद येथे एका मौलानाच्या घरी विवाह केला,त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लिम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त केल तसेच गोमास खाण्यासाठी जबरदस्ती केली जात होती असा आरोप पीडित तरुणीने केला, अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. ३ दिवसांपूर्वी तिला नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करून दिला घरी आणले, आता सदर तरुणी सुखरूप असून तिने आपल्यावर होत असलेली अत्याचाराची सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडली.
या युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली होती मात्र धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमाली चा हलगर्जीपणा केला असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला. मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबा वर कारवाई करून त्यांना अटक करा वी व मुलीचा शोध न घेणाऱ्या धार नी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते खा अनिल बोंडे यांनी केली आहे.