जनतेज न्युज

अमित शाह यांनाही कारवाईमुळे हद्दपार केलं होतं, तेव्हा भाजपाने कोणावर आरोप केले नाहीत – रावसाहेब दानवे

प्रतिनिधी, जालना :  ईडीला जयंत पाटलांकडे काही तरी सापडलं असेल म्हणून त्यांची चौकशी सुरु असेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड येथील एका कार्यक्रमानंतर दानवे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मात्र ईडी असो सीबीआय असो या स्वायत्त संस्था असून सरकार यांचा वापर करत नाही. देशाचे पंतप्रधान मोदी यांचीही सीबीआयनं चौकशी केली होती. अमित शाह यांनाही हद्दपार केल होतं. त्यावेळी कॉंग्रेसचं सरकार होतं. आम्ही कधी कॉंग्रेस वर आरोप केला नाही. अशा वेळी आमच्यावर आरोप करणं हे राजकारण आहे. ईडीच्या कारवाईवरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी जयंत पाटलांवर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.