जनतेज न्युज

पुण्याची कसबा पेठ निवडणूक बिनविरोध व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी, पुणे : पुढील वर्षी फिनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण होऊन भाविकांना ट्रॉलीतून मलंगडावर जाता येईल अस  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  आज मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे मलंगडावर मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी आले होते.  यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी पत्रकांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील वर्षी फिनिक्युलेर ट्रॉलीचे  काम पूर्ण होईल असं सांगितलं तसंच पुण्यातील कसबा पेठ निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणं केलं असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. अंधेरी पोटनिवडणुकीत जशी बिनविरोध झाली होती त्याच प्रमाणे  ही सुद्धा निवडणूक बिनविरोध व्हावी असं एकनाथ शिंदे म्हणाले.