प्रतिनिधी, नाशिक : सत्यजित तांबे ज्यावेळेस काँग्रेस बद्दल बोलतात त्यावेळी लोकांमध्ये काँग्रेस बद्दल व काँग्रेसच्या नेत्यांबद्दल संभ्रम निर्माण होत असून बाळासाहेब थोरात यांनी यात लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना दिली. संभाजी पवार हे राष्ट्रवादीत येणार असे विचारले असता यावेळी भुजबळ म्हणाले की .. संभाजी पवार यांनी फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये भुजबळ यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला अनेक वेळेस घरी जेवायला देखील बोललो होते आज मी त्यांच्या घरी चहा पिण्यास जाणार असून त्याच अर्थ काय ते लगेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत येतील असं काही नसून आमची शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे त्यामुळे याबाबत काही कोड्यात पडण्यास काही कारण नाही असे भुजबळ म्हणाले.
