जनतेज न्युज

बंजारा समाजाच्या दैवतांचा विकास करणे ही सरकारची जबाबदारी – संजय राठोड

प्रतिनिधी, नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील ग्रामदैवत व बंजारा भाविकांचे कुलदैवत सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवास सुरुवात झाली असून मंत्री संजय राठोड यांनी कुलदेवतेचे दर्शन घेत महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी व आरोग्य जीवन मिळावे तसेच शेतकरी व शेतमजुरांसाठी आमच्या सरकारकडून चांगलं काम घडावं अशी मागणे देवाकडे मागितले.  वडांगळी सारखच बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्र हे पोरागडला असून त्या ठिकाणी सेवालाल महाराजांचं स्थान असून या ठिकाणी सामतदादांचा दैवत आहे या दोन्ही ठिकाणी विकासाची सरकारची जबाबदारी आहे असे संजय राठोड म्हणाले.