जनतेज न्युज

कासार समाजाच्या राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याची धुरा महिलांच्या हाती

प्रतिनिधी, अकोला : अकोला शहरातल्या मराठा मंगल कार्यालयामध्ये कासार समाजाचा ऋणानुबंध हा वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये विदर्भातील अकराही जिल्ह्यातील महिलांनी एकत्र येऊन हा मेळावा संपन्न केला आहे. तर या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी निरमा अरोरा. तसे प्रमुख अतिथी महानगरपालिकेच्या आयुक्त कविता त्रिवेदी तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव होत्या. शासनाने 50% आरक्षण दिल्यानंतरही कुठेच महिला या सक्रिय दिसून येत नाहीत. पण कासार समाजातील महिलांनी एकत्र येत आता कासार समाजाची धुरा ही महिलांच्या हाती चा कन्सेप्ट घेत याची सुरुवात अकोल्यातल्या वधू-वर परिचय मेळाव्यातून केली आहे… या मेळावा मध्ये पाहूण्याच्या स्वागता पासून  ते स्टेजवरील परिचयाची सर्व धुरा महिलांच्या हाती होती.त्यामुळे कुठेतरी हा कासार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा समाजासाठी एक आदर्श ठरत आहे.