निवडणुकांवरून माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेय. आपल्या सोयीनुसार पॅनल करण्याच्या पद्धती लोकशाहीला घातक आहेत. सत्तेत असलेल्यांना निवडणुका घ्यायची भीतीच वाटत असेल तर ही लोकशाहीची हत्या होतेय. जो पर्यंत नगरसेवक बसत नाही तोपर्यंत प्रशासनाची सत्ता आणि प्रशासनावर मंत्रालयाचा अंकुश असल्याने सत्ता मंत्रालयात. नवी मुंबईची फार वाईट अवस्था कारण सत्ता आयुक्तांच्या हातात स्थिरावलेय. आयुक्तांना लोकांशी काही घेणं देणं नसतं जे मतदानाने निवडून येतात त्या नगरसेवकांवरती एक सामाजिक जबाबदार असते. काम न केल्यास पुढच्यावेळी निवडणुकीत पराभव होईल या भीतीमुळे नगरसेवक काम करत असतात. मात्र या सरकारला हे पटत नाही त्यामुळे चालुद्या टोला माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावलाय.
