प्रतिनिधी, पुणे : तानाजी सावंत यांच्या दोन दिवस दौरा ठरला होता वादाच्या भवर्यात अनेक राजीक्या पदाधिकाऱ्यांनी केली होती टीका घर ते कार्यल्या आणि कार्यालय ते घर असा होता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दौरा या बाबत आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत ॲक्शन मोडमध्ये सावंत म्हणले आज माझ्याकडे ग्रामीण भागातून पुण्यात उपचारासाठी आलेले तरुण येऊन भेटले असता.ससून रुग्णालय पुणे येथील प्रशासन त्यांना 2 दिवसांपासून उपचारासाठी उपलब्ध होत नाही अशी माहिती मिळाली. त्या तरुणाला उपचाराची गरज असताना 2 ते 3 दिवसांपासून रुग्णालयात येऊन देखील आरोग्य यंत्रणा उपलब्ध होत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही एक प्रातिनिधिक स्वरूपातील घटना समोर आली म्हणून आज स्वतः ससून रुग्णालयात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना रूग्णालयात कोणत्याही रूग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, अश्या सूचना यावेळी दिल्या. जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत अतिशय तत्पर असणे आवश्यक असते याचं भान सर्वांनी राखणं गरजेज आहे.
