प्रतिनिधी, नांदेड : कोरोना काळात रुग्णावर प्रत्यक्षात केलेले उपचार आणि झालेल्या खर्चात प्रचंड तफावत असल्याचे आढळल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने डॉ. अंकुश देवसरकर आणि आशा हॅास्पिटलला साठ हजाराचा दंड ठोठावला आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील माध्यमशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. कैलास यादव यांचे वडील भानूदास यादव यांना 20 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना डॉ. अंकुश देवसरकर यांनी आशा हॅास्पिटल मध्ये तयार केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान २८ जुलैला त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रेमडीसीवीर इंजेक्शन एकच दिले असताना पाच इंजेक्शन दिल्याचे आणि बायपॅक मशीन लावल्याचे सांगितले गेले प्रत्यक्षात उपचारात तफावत आढळल्याने डॉ. कैलास यादव यांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली होती.. यावेळी ग्राहक तक्रार निवारण केंद्राने डॉ. देवसरकर आणि आशा हॉस्पीटल ला ५० हजाराचा दंड लावून तातडीने दंड भरपाई म्हणून डॉ. यादव यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
