जनतेज न्युज

हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु आहे – विश्वजित कदम

प्रतिनिधी, सांगली : देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणांचा गैर वापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो हे देशासाठी घातक आहे. अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजप केंद्र सरकार वर केली आहे . माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम हे आज सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.देशामध्ये आता लोकशाही राहिले की नाही हा प्रश्न देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना आता निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेवून आज विरोधी पक्षांचा आवाज हा दाबला जात आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांचा छळवात चालु आहे. हे निश्चितपणे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि एखाद्याची चौकशी करायची असेल तर निश्चितपणे न्याय प्रक्रियेत योग्य पद्धतीने व्हावे पण जेव्हा एखादा आवाज उठवला जातो तो सर्वसामान्य लोकांसाठी जातो सरकारकडून काही चुकीचं घडत असेल त्याच्या विरोधात उठवला जातो की लगेच मग केंद्रीय यंत्रणा कडुन आज त्याला या ठिकाणी त्रास दिला जातो.नजीकचा इतिहास आपल्याला आठवत असेल की तमिळनाडूमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुका होत असताना खुद्द मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना टार्गेट केले गेले. बंगालमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होत असताना तिथल्या अनेक नेत्यांना या ठिकाणी अशाच प्रकारे टार्गेट करण्यात आले सोनीया गांधी असतील राहुल गांधी असतील त्यांनाही टार्गेट केले जाते म्हणजे हळूहळू एक वेगळ्या पद्धतीचे हुकूमशाही या देशांमध्ये अन्नाचा प्रयत्न आज सत्तेत बसलेले हे सरकार करत आहे हे दुर्दैवी बाब आहे
परंतु त्यांना इतिहास माहित नाही ज्यांनी ज्यांनी जुलमी कारभार या देशावर केला त्याच्या विरोधात मोठी लाट या ठिकाणी आणि स्वातंत्र सैनिकांची लाट उभी राहिली आणि त्या जुनूनला नष्ट करण्याचं काम या देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी थोर पुरुषांनी वीर पुरुषांनी केलेले आहेत पण त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल.