जनतेज न्युज

बळजबरीने लावण्यात आलेला तो आंतरधर्मीय विवाह अवैध

प्रतिनिधी, अमरावती : भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी एक हिंदू -मुस्लिम हा बळजबरीने लावण्यात आलेला आंतरधर्मीय विवाहाच प्रकरण दोन दिवसांपूर्वी उघडकीस आणलं होतं,त्यावेळी त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली होती तर यात आज अमरावती येथील आंतरधर्मीय विवाह चंद्रविला धर्मदाय संस्थेला लग्न लावून देण्याचा अधिकारी नाही त्यांनी बनावट कागदपत्राचे आधारे हे लग्न लावून दिले व तो मुस्लिम काजी नसून एका मजुराची काजी म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचे पोलीस तपासात पुढे आलं त्यामुळे चंद्रविला संस्थे विरुद्ध अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कलम ४६८ व ४१७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन हा विवाह लावून दिला आहे, तर गेल्या १०वर्षांपासून या चन्द्रविला संस्थेने अनेक बोगस कागदपत्राच्या आधारे लव्ह जिहाद सारखे प्रेम विवाह लावून दिले या लव्ह जिहादसाठी त्यांना विदेशातुन फंडिंग होत आहे का असा सवाल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला तर थातुरमातुर कारवाई नको चंद्रविला या संस्थेचे सर्वे कागदपत्रे तपासणी करावी अशी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली.