प्रतिनिधी, बुलडाणा : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या नंबरसाठी आज ३ सप्टेंबर रोजी शहर पोस्टेच्या आवारात गणेश मंडळ तसेच शांतता समिती सदस्य यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत मिरवणूक सहभागी होणाऱ्या २८ गणेश मंडळाचे नावाचे चिठ्ठ्या टाकून लकी ड्रॉ काढण्यात आला.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच यावेळी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ३१ ऑगस्ट रोजी गणेश स्थापना झाली आहे. शहरात २८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची परवानगी मागितली आहे. नेहमीसाठी शिवाजीनगर व शहर पोस्टेअंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केल्या जातो. गणेश विसर्जन असून यासाठी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याकरिता शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे क्रमांक / ठरविले जातात. त्याअनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने नंबर ठरविण्यासाठी एएसपी श्रवण दत्त, डीवायएसपी अमोल कोळी, शहर पोस्टेचे ठाणेदार प्रदीप त्रिभूवन, शिवाजीनगर पोस्टेचे ठाणेदार अरूण परदेशी यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आले. यावेळी ध्वनी प्रदूषणामुळे वयोवृद्ध तसेच लहान मुले आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढली की मनुष्याच्या हृदयाची धडधड वाढू शकते ध्वनी प्रदूषण टाळावे असे आवाहन सुद्धा केले आहे.
