जनतेज न्युज

बाई म्हणत हिनविणे म्हणजे बाईचा – आईचा अपमान – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

प्रतिनिधी, चंद्रपूर : आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्या गटाला पेंग्विन सेना म्हणायचे का असा पत्रातून विचारला होता सवाल, भाजपला कमळाबाई असे हिणविले जाते असे मत, यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली प्रतिक्रिया, बाई म्हणत हिनविणे म्हणजे बाईचा -आईचा अपमान,ज्यांची मानसिकता विकृत त्यांनी असे उल्लेख चालविले असेल असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष एड. आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्या गटाला पेंग्विन सेना म्हणायचे का असा सवाल पत्रातून विचारला होता. भाजपला कमळाबाई असे सामनातून हिणविले जाते असे त्यांचे मत आहे. या मुद्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिले आहे. बाई म्हणत हिनविणे म्हणजे बाईचा -आईचा अपमान असून ज्यांची मानसिकता विकृत आहे त्यांनी असे उल्लेख चालविले असेल असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. अशांना सावित्रीबाई कधी समजल्याच नाही असेही ते म्हणाले.