प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे, भानसळे, कळंबवाडी, खडकोणी गावाचा संपर्क तुटला
गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने आगळगावातील चांदणी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
संततधार पावसामुळे सोयाबिन, उडीद, मूग पिके पिवळी पडायला लागली आहेत.
