प्रतिनिधी, बारामतीत : बारामतीत धनगर समाजाचे पाच दिवसापांसून आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी धनगर उपोषणकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचा धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे, तसेच मी वारंवार लोकसभेत धनगर आरक्षणाबाबत भूमिका मांडल्या आहेत. यावेळी धनगर समाजातील काही तरुणांमध्ये आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांसह खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन करत धनगर समाजाची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. मात्र, धनगर समाजातील तरुणांनी राज्यातील एकही नेत्याला गोविंद बागेमध्ये येऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. आणि या युवकांशी देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा करत यामधून मार्ग काढला.
