जनतेज न्युज

बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग;नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी, यवतमाळ : बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाण वाढ झाल्यामुळे प्रकल्पाचा जलाशय वाढत आहे. जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांचे आदेशानुसार बुधवारी रात्री 1.30 वाजता 04 दरवाजे 25 सेमी ने उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग 100 घमी/से एवढा आहे. धरणात येणाऱ्या येव्यानुसार विसर्ग कमी/जास्त करण्यात येणार आहे. दरम्यान नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.