जनतेज न्युज

भाजपा जिल्हाध्यक्ष यांची केंद्रीय नेता प्रवास समिती पदी सहसंयोजक पदी नेमणूक

प्रतिनिधी, नंदुरबार : आगामी काळातील कार्यक्रम, सभा व देशभरातील निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नडडा, गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रातील भाजपचे नेते, केंद्रिय मंत्री, पदाधिकारी देशभर प्रवास करणार आहेत. हा प्रवास नियोजनबद्ध व गुणात्मक, संख्यात्मक दृष्ट्या चांगला होण्याच्या दृष्टिकोनातून प्रदेश स्तरावर केंद्रीय नेता प्रवास योजना समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या प्रदेश सहसंयोजक उत्तर महाराष्ट्र पदी भाजपा नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्ह्यात भाजपचे काम चांगल्या प्रकारे केले असून पक्षवाढी साठी मोठ्या जोमाने काम करीत आहे. त्यांच्या या पक्षीय कार्याची दखल घेत केंद्रातील मंत्री व भाजपाचे केंद्रातील नेते यांच्या प्रवासाच्या योग्य नियोजनाच्या दृष्टिकोनातून विजय चौधरी यांची नियुक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पक्षाने माझ्यावर जी जवाबदारी सोपवली आहे, त्यासाठी योग्य नियोजन करून त्या दृष्टीने माझे काम सुरू राहील असे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले.