प्रतिनिधी, नंदुरबार : प्रदेशाध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत मंगळवारी त्यांचा हा दौरा होणार आहे . याअंतर्गत नळवा येथे सकाळी बूथ बैठक घेण्यात येणार आहे यानंतर दुपारी त्यांच्या उपस्थितीत बाइक रॅली काढण्यात येणार असून , छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नंदुरबारात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसोबत असणार असुन जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व शक्तिकेंद्र बैठक घेण्यात येणार आहे . दुपारी कन्यादान मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत लोकसभा व विधानसभा कोअर कमिटीची बैठक होणार आहे . सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश तेली महासंघाचा मेळावा होणार असून , यावेळी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे.
