जनतेज न्युज

जिल्ह्यात 3महिन्यात अतिवृष्टीमुळे 6 हजार 898 शेतकऱ्यांचं नुकसान

प्रतिनिधी, जालना : चालू खरीप हंगामात जून,जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे 6 हजार 898 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून बाधित क्षेत्र 2 हजार 328 हेक्टर इतकं आहे.या बाधित क्षेत्रासाठी 3 कोटी 79 लाखांचा निधी प्राप्त झाला असून ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी दिली आहे.सप्टेंबर महिन्यात जो पाऊस झाला आहे त्याचेही पंचनामे करण्याचं काम सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे आणि त्यांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांनी 48 तासांच्या आत संबंधित कंपनीशी संपर्क करावा असं आवाहन देखील रणदिवे यांनी केलं आहे.