जनतेज न्युज

भाऊ आला वाडीत अवैद्य धंदे गेला जोडीत …. # खेळा मटका # खेळा सोरट हातभट्टीला नाही तोटा … जोडीला ठेवल्यात नोटा….

प्रतिनिधी, पुणे : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन म्हणजे ना दाद ना फिर्याद अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचा कोणताही तक्रार अर्ज थेट स्वीकारला जात नाही . हे साहेब येऊ द्या …ते साहेब येऊ द्या ….असे सांगून नागरिकांना दोन दोन तास पोलीस स्टेशन बाहेर तीइष्ट ठेवले जात आहे. वाढीचा संपूर्ण परिसर हा गोरगरीब कष्टकरी मध्यमवर्गीय समूहांचा आहे . या समूहांच्या छोट्या छोट्या तक्रारी असताना देखील त्याच्यावर कुठलीही कार्यवाही केली जात नाही . त्यामुळे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची सर्व दप्तर तपासणी करण्यात येऊन दोशी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे .
आज विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक प्रकारचे जुगार अड्डे सुरू असून यात मटका अड्डा पणती पाकोळी सारखा सुरत काचेवरचे सुरत हातभट्टी देशी विदेशी दारूची सर्रास बेकायदा विक्री जाईन त्या रस्त्यावर नागरिक दारू पीत बसलेले बस दिसतात. संपूर्ण विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला या सर्व अवैद्य धंद्यांचा विळखा पडलेला आहे . यामुळेच केवळ अवैद्य धंदेवाल्यांवर कारवाई करणे पुरेसं नसून संबंधित जबाबदार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी तक्ता तपासून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.