जनतेज न्युज

भय आणि भ्रष्टाचाराच्या आधारावर लोकशाही विकण्याचे काम भाजप करत आहे – नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

प्रतिनिधी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे असून 2014 पासून सातत्याने भारतीय जनता पक्षाने या देशातील जनतेला आणि ओबीसी बांधवांना सांगून मत लुटली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबिसोचे पंतप्रधान आहे अस भाजपकडून सातत्याने सांगितल जात आहे.काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण माहिती काढण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही.आणि हे आम्ही देशपातळीवर जाहीर करू.भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहे अस सांगून ओबीसींचे मते लुटण्याचा काम करत आहे.आणि हे आम्ही सर्व जनतेसमोर आणू अस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितल आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ओबीसी समाजाची जातनिहाय गणना ही केंद्रानेच केली पाहिजे.राज्याने नव्हे.आज जे ओबीसी समाजाचा फुटबॉल केलं जात आहे.ते करू नये.केंद्र सरकारने जे संविधानात आहे ते केंद्र सरकारने देश भरात लागू करावं.ही मागणी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाची आहे अस देखील यावेळी नाना पटोले म्हणाले. नेता हा मालक कधीही नसतो. काँग्रेस ने देश उभा केला म्हणुन हे देश विकुन देश चालवतात. भय आणि भ्रष्टाचाराच्या आधारावर लोकशाही विकण्याचे काम भाजप करत आहे,

काल राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की औद्योगिक शेत्रात महाराष्ट्र हा गुजरात पेक्षा पुढे जाणार आहे.माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहे.ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2014 ते 19 साली किती प्रोजेक्ट हे गुजरातला गेले हे त्यांनी जाहीर करावं.ते माझे मित्र असून त्याच उलट डीमोषन झाले.ते राज्याचे डीजी होते त्यांना आत्ता भाजपने डीसीपी केलं आहे.आमच्या मित्राचं अपमान हे एक प्रकारे झालं आहे.असा टोला देखील यावेळी पटोले यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे ती यात्रा राजकीय यात्रा नाही.आज राहुल गांधी हे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी निघाले आहे.ज्यांना देशाच्या बरोबर राहायचं असेल त्यांना निमंत्रणाची गरज नाही.राज्यात जेव्हा यात्रा येईल तेव्हा जे समविचारी पक्ष आहे त्यांना निमंत्रण देण्यात येईल.अस देखील यावेळी पटोले म्हणाले.

सध्या गृहपाठवरून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे.त्यावर पटोले म्हणाले की केंद्रात आणि राज्यात जे सरकार आत्ता आहे.त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळू नये अश्या प्रकारचा धोरण हे त्यांनी राबवण्याचा काम सुरू केलं आहे.आणि शिक्षण प्रणालीत मोठे बदल ते आणतील.असे देखील यावेळी पटोले म्हणाले.

नोटबंदी हा देशातील विविध जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. नोट बंदीच्या काळात भाजपने प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीही विकत घेतल्या.आणि कार्यालय बांधले.चिवडा पार्टी ही भाजप होती. नोट बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हा जमा करण्यात आला. आणि त्या पैशांच्या माध्यमातून आज देशभरात राजकारण केला जात आहे.आमदारांना विकत घेतलं जातं आहे. केंद्रातील तपास यंत्रणांच्या भय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोकशाही विकत घेण्याचा जो प्रकार भाजपने सुरू केला आहे.त्यावर लक्ष दिलं पाहिजे. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टींवर राजकारण भाजप करत आहे.अशी टीका देखील यावेळी पटोले यांनी केली.

काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की ते स्वतः हा भय आणि भ्रष्टाचारामुळे तिथे गेले आहेत ते का तिथे गेले हे पहिले त्यांनी जाहीर करावं.ज्यांना काँग्रेसने मोठ केलं तेच आत्ता काँग्रेसवर बोलत असतील तर त्यांच्यावर काय बोलायचं अस देखील यावेळी नाना पटोले यांनी सांगितल.