जनतेज न्युज

बुलढाण्यात दुसरे महानुभव साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी, बुलडाणा : दुसरे महानुभव साहित्य संमेलन बुलडाणा येथे आयोजीत करण्यात आले होते. या संम्मेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकलेल्या सर्वसामान्य माणसाला भक्तीचा अधिकार मिळवून देण्यात चक्रधर स्वामीचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे.. यावेळी व्यासपीठावर संमेलन अध्यक्ष व महानुभाव साहित्य संशोधनाचे लेखक प्रा डॉ अविनाश आवलगावकर आचार्य लोणारकर बाबा ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य अमोल ठाकरे यावेळी उपस्थित होते. या साहित्य संमेलनामध्ये महानुभाव संप्रदायाचा समाजावरील परिणाम व सांस्कृतिक अभिसरण यावर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाल आश्रम येथून लीला चरित्राची ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये महिला पुरुष व महानुभव पंथाचे अनुयायी सहभागी झाले होते. हे अधिवेशन 17 आणि 18 सप्टेंबरला असणार आहे.. या साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातील लेखक कवी व महानुभव पंथाचे साहित्यिक सहभागी झाले