प्रतिनिधी , बुलडाणा : राज्यात बाल विवाह प्रतिबंध कायदा अमलात असून, हे बाल विवाह टाळण्यासाठी शासनाकडून मोठी जनजागृती केली जाते, तरी देखील अजूनही बाल विवाह केल्या जात असल्याचे समोर आले आहे.बुलढाणा जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान २५ बालविवाह रोखन्यात बाल कल्याण समितीला यश आले आहे.ज्यामध्ये अनेक जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बाल विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ बाल कल्याण समिती ला संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
