जनतेज न्युज

चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी घेऊ लागले भरीताचे स्वाद

प्रतिनिधी , जळगाव : राज्यात ऋतूनुसार खवय्यांचे पार्ट्या होतात तर ऋतूनुसार त्या पदार्थाला घरोघरी पसंद केला जातं असेच हिवाळा लागला दिवाळी झाली तर खान्देशात भरीत पार्टी व घरोघरी भरीत हा पदार्थ जेवणामध्ये केला जातो आणि खवय्यांची मजा होते जळगाव जिल्ह्यात भरिताचे वांग्यांची मागणी आणि त्याचे स्वाद हा वेगळाच आहे डिसेंबर महिना सुरू आहे कापूस वेचून झालेला आहे तूर देखील तोडणीला आलेली आहे कापसाचे काड्या व तुरीचे काड्या याच्यावर ग्रामीण भागात भरीताचे वांगे भाजले जातात त्याच बरोबर त्याच्यावरच हिरवी मिरची देखील भाजली जाते या काड्यांवर भाजलेल्या भारीताचे वांग्याचे भरीत याचा स्वाद जो येतो तो स्वाद गॅसवर भाजलेल्या वांग्याचा येत नसल्याने ग्रामीण भागामध्ये आज देखील काड्यांवर भरीताचे वांगे भाजून भरीत केलं जातं शेतकरी राजा व शेतमजूर सायंकाळ झाली की ग्रामीण भागात आपल्या अंगणात काड्यांची शेकोटी पेटवतात आणि त्याचा वर भरीताचे वांगे भाजताना जिकडे पाहावे तिकडे दिसतात सध्या भरीताचे वांग्याचे भाव खूपच कमी असल्याने सामान्यातून सामान्य नागरिक ते श्रीमंत सर्व जण भरीत खायला पसंत करतात वांगे हे उष्ण असल्याने आणि हिवाळ्यात गुलाबी थंडी यामुळे भरीत खाण्यासाठी खवय्यांची रांग लागत असते तसेच घरोघरी ग्रामीण भागात भरीतसाठी वांगे भाजताना नागरिक व महिला दिसतात भरीत करताना जेवढे साहित्य यामध्ये टाकलं जातं तेवढा स्वाद वाढत असतो असे ग्रामीण भागातील नागरिक सांगतात.