प्रतिनिधी, नाशिक : चांदवड येथे उपजिल्हा रुग्णालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग नाशिक तसेच उपजिल्हा रुग्णालय चांदवड त्याचप्रमाणे तालुका आरोग्य कार्यालय यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न, यावेळी ब्रायटो कंपनी पुणे यांनी फुफुसाची तपासणी यांच्यामार्फत करण्यात आले. तसेच या शिबिरात मा. ना. भारतीताई पवार आरोग्य राज्यमंत्री यांचा वाढदिवसानिमित्त सदर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी भारतीताई पवार, राहुल दादा आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नाशिक लीला बनसोडे, यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉक्टर रघुनाथ भोई उपसंचालक, डॉक्टर अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर कपिल आहेर , जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर देवरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, याप्रसंगी डॉक्टर प्रशांत खैरे, डॉक्टर सुशील कुमार शिंदे, डॉक्टर पंकज ठाकरे, गट विकास अधिकारी महेश पाटील, अंगणवाडी व अशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे उपसंचालक डॉक्टर रघुनाथ भोई यांनी अधिक माहिती दिली.
