प्रतिनिधी, नाशिक : चांदवड येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला असून, तो असा की, ठेकेदाराकडून चांदवड येथील आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह असलेल्या ठिकाणी जेवणाचा ठेका दिलेला आहे. असे असताना अनेक तक्रारी येत होत्या परंतु अशाच एक ना अनेक तक्रारी मधून मुलांचे वस्तीगृह येथील अधीक्षक राठोड यांना काही दिवसापूर्वीच मुलांच्या अनेक तक्रारी व कार्यालयीन कामकाजात कसूरता अशा एकना अनेक गोष्टींच्या तक्रारी असल्याने वरिष्ठ कार्यालयाने काही दिवसापूर्वीच यांना निलंबित केलेले आहे असे समजले. ? असाच विषय समोर ठेवून प्रभारी अधिकारी म्हणून कार्यान्वित असलेले देवळा आदिवासी वसतिगृह येथील ठोंबरे यांची नियुक्ती चांदवड येथे करण्यात आलेली आहे. तसेच स्री अधिक्षिका म्हणून स्वप्नाली पाटील या मुलींचे वसतिगृह येथे कार्यान्वित आहेत. हे असताना औरंगाबाद येथील ठेकेदार यांना जेवणाचा ठेका दिलेला असताना यांच्या कामकाजामध्ये अनेक तक्रारी असून मुलांनी वारंवार तक्रारी केलेल्या होत्या परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते .दुधात पाणी की पाण्यात दूध,नाश्ता बेचव,त्यात मिठ रोजच कमी,स्वच्छ न केलेला भाजीपाला असे अनेक प्रश्न निर्माण केले होते. तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न नाश्ता हा वारंवार दिल्या जातो. असे विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली याच अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी जेवणामध्ये सोयाबीन ची सुखी भाजी व रोटी बनविण्यात आली होती. या भाजीत अनेक अळ्या स्पष्ट दिसून येत होत्या. अशी भाजी जर जेवणात घेतली तर या गरीब आदिवासी मुलांनवर अन्याय होतोय असे दिसून आले. तर यांना कोण न्याय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मागचा उद्देश काय असेल व यापुढे काय होईल यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुलांच्या जेवणात अळ्या निघाल्यामुळे निदर्शनास आल्याबरोबर संबंधित ठेकेदार यांना नोटीस काढण्यात आली आहे व वरिष्ठ कार्यालयाला देखील याबाबत कळविलेले आहे. काय निर्णय घेणे अपेक्षित आहे याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. असे प्रभारी अधीक्षक यांनी उडवा उडीचे उतर देण्यात आले. तसेच स्त्री अधिक्षक स्वप्नाली पाटील यांनी जेवणात अळी निघाल्या अशी कबुली केली. तर ठेकेदारांचा कुठलीही व्यक्ती जेवणा संदर्भात सांगण्यास टाळाटाळ करत आहे तर मुलांनी जेवणात निघालेल्या आळी संदर्भात व जेवण निकृष्ट देत्यात या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली तर मुलांनी जेवणात निघालेल्या आळी संदर्भात व जेवण निकृष्ट देत्यात या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली.
