जनतेज न्युज

चांदवड जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी, नाशिक : भारतावर 150 वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या जोखाड्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आदिवासी क्रांतिवीर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा उमाजी नाईक खाजा नाईक राघोजी भांगरे राणी दुर्गावती तंट्या भिल गुलब्या नाईक आशय अनेक आदिवासी विराणी जल जमीन जंगल व देशाला स्वतंत्र मिळून देण्यासाठी हजारो आदिवासी वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे .आपल्या या महान नेत्यांनी दिलेल्या हे योगदान आपल्यासाठी प्रेरणादायक आहे त्याचे हे महाकार्य आपल्या सर्वांना कायमचे मार्गदर्शन म्हणून राहील. या महान नेत्यांच्या स्मृती परत जागून नवीन पिढीला त्यांच्या आदर्श ची ओळख करून देण्यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचा नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट क्रांती दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील आदिवासी वीरांची वेशभूषा धारण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वप्रथम पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी चौक सोमवार पेठ चांदवड मनमाड रस्त्याने घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्या ठिकाणी विविध वेशभूषा करून गीतांचा कार्यक्रम करून नागरिकांचे मन जिंकून घेतले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड दत्तू भोई कॉम्रेड नवनाथ आंबेकर सचिव हे असून त्याचप्रमाणे कॉम्रेड हनुमंता गुंजाळ कॉम्रेड तुकाराम गायकवाड कॉम्रेड राजाराम ठाकरे कॉम्रेड सारिका गुंजाळ ताईबाई पवार आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून आदिवासी दिन पार पाडला. त्याचप्रमाणे सारिका गुंजाळ व वेशभूषा करणारे  यांनी अधिक माहिती दिली.