प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरात मातमी जुलूस व मोहर्रम निमित्ताने सवारीयांचा जुलुस सिटीचौक येथे काढण्यात आला. सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर सवा-यांचे स्वागत करण्यासाठी नियोजन समितीच्या वतीने व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळपासून सवा-या व मातम बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शिया समुदायाकडून काळे पोषाख परिधान करून मातम करण्यात आले. यावेळी शिया समुदायाचे एजाज झैदी व समाजातील बांधव उपस्थित होते. नेहमी प्रमाणे परंपरा आहे पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता हे नियोजन समितीच्या सदस्यांचे स्वागत करतात. याहीवेळी मा.महापौर रशीद खान मामू, अफसरखान व सदस्यांचे आयुक्तांनी पांढरा फेटा बांधून स्वागत केले. यावेळी विदेशी पर्यटकांनी आश्चर्य व्यक्त करत मातमी जुलूस बघितला.
