जनतेज न्युज

शहरात गरबा दांडियाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी; नमो दुर्गा दांडियाला केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली भेट

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गरबा दांडियाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे शहरातील नमो दुर्गा दांडियाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या दोन वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करता आला नाही यावर्षी नियम शितल झाल्यामुळे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येत आहे असे महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे नमो दांडियाला पासेस व कपल असले तरच प्रवेश दिला जात होता या दांडियाला केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी येऊन सदिच्छा भेट दिली व नागरिकांना आज दहा ऐवजी बारा वाजेपर्यंत खेळण्याची मुभा दिलेली आहे तशी परवानगी घेतली आहे असे यावेळी त्यांनी सांगितले त्यामुळे दांडिया खेळणाऱ्यांचा जल्लोष आणखी वाढला.