जनतेज न्युज

राज्यात लंपीची परिस्थितीत नियंत्रनात- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

प्रतिनिधी, अमरावती : राज्यात लंपी रोग नियंत्रणासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लंपी प्रतिबंधक लसीकरण गतीने पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या,राधाकृष्ण विखे पाटील हे अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला,राज्यात लम्पिची परिस्थिती नियंत्रणात असून शेतकऱ्यांनी काळजी चिंता करू नये तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडनार नाही कारण ज्या जनावरांचा मृत्यू झाला त्यांना आर्थिक मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरुड तालुक्यातील शेंदुरजना घाट येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या क्षेत्रात लंपीबाधित परिसराची पाहणी करून पशुपालकांसोबत संवाद साधला.