प्रतिनिधी, ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज दुपारी महा आरती केल्यानंतर संध्याकाळी शिंदे गटाच्या ठाणे महिला संघटक अणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी अत्यंत साधेपणाने महा आरती केली. या वेळी पालिकेतील माजी नगरसेविकांच्या बरोबर इतर महिला पदाधिकारी देखील सहभागी झाल्या होत्या. आज रश्मी ठाकरे आल्यावर करण्यात आलेली आरती ही आरती नव्हती तर एक प्रकारचा इव्हेंट होता असा टोला ठाण्यातील शिवसेनेच्या महिला संघटक अणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लगावला आहे. त्यांना मुंबईचे लोक आणावे लागले. आम्हाला सांगितल असत तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते अस देखील मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.
