जनतेज न्युज

राऊत कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रश्मी ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल

प्रतिनिधी, मुंबई : रश्मी ठाकरे या संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत संजय राऊत यांच्या घरी देखील नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि राऊत कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रश्मी ठाकरे या आज त्यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी पोहोचल्या. संजय राऊत यांच्यावर अटकेची कार्यवाही झाल्यानंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे या त्यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत. एकंदरीत संजय राऊत हे सध्या कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना दिलाय.