जनतेज न्युज

शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव मिळत नसल्याने तहसील कार्यालय येथे आंदोलन

प्रतिनिधी, यवतमाळ : घाटंजी येथे  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी एक दिवसीय  आंदोलन घाटंजी येथे करण्यात आले यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ठेवण्यात आल्या कापूस तुर सोयाबिन ला योग्य भाव द्यावा कापूस सोयाबिन निर्यात खुली करावी ,कापूस सोयाबिन वरिल निर्यात खुली करावी कापूस व ईतर शेतमालाच्या आयातिवरील निर्बंध ऊठवावे, क्रुषी पंपाना दिवसा विज देण्यात यावी ,जंगली जनावरां पासून शेतमालाचे रक्षण करण्यात यावे, तांत्रिक बाबीमुळे राहिलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी ह्या मागण्या घेवून  शेतकरी आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग घाटंजी येथील तहसील कार्यालय येथे ऊपस्थित होता.