जनतेज न्युज

CCTV फुटेजच्या मदतीने राजूर पोलिसांनी चार सराईत गंठनचोर गुन्हेगारांना केले जेरबंद

प्रतिनिधी , अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व राजूर बसस्थानकात प्रवासी लोकांचे सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीस राजूर पोलिसांनी सापळा रचून, मुद्देमालासह जेरबंद केले आहे. राजूर परिसरात केलेल्या अनेक गुन्हांची कबूली या गंठनचोरांनी संगमनेर व अकोले पोलिसांना दिला आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील बसस्थानकात एका महिलेचे बसमध्ये बसतांना पर्स मधून १६ ग्राम ९६० मिली वजन असलेले ९६ हजार रु. किमतीचे सोन्याचे नेकलेस लंपास केले. ही गोष्ट सदर महीलेच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने राजूर पोलीस स्टेशनचे नितीन पाटील यांची भेट घेऊन फिर्याद नोंदवली होती.अकोले व संगमनेर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन या चोरीचा तपास लावण्यासाठी धावपळ सुरु केली. बसस्थानक परिसरातील cctv फुटेचा आधार घेत चारही गंठनचोरांना जेरबंद करण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे.