प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : खडकपाडा चौकातील उखडलेले पेव्हरब्लॉक आणि चेम्बर्सची झाकणे तुटल्याने तयार झालेला खड्डा मृत्यूचा सापळा बनला असून दररोज वाहनचालकांना या खड्ड्यात अपघाताला सामोरे जावे लागत आहे. गेले दोन दिवसापूर्वी या खड्ड्यात एक रिक्षा अडकल्याने रिक्षाचा पुढील टायर तुटून मोठा अपघात होता होता वाचला यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी आंदोलन छेडले. आज खडकपाडा परिसरात तुटलेल्या चेंबर बाहेर पालिकेचा निषेध असा बॅनर लावत पुढील २४ तासात रस्ते दुरुस्ती सुरु न झाल्यास जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.
