जनतेज न्युज

चोपडा सूतगिरणीचे उद्या मतदान ; साहित्य वाटप मतदान केंद्रांवर पथक रवाना

प्रतिनिधी , जळगाव : चोपडा येथील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी निवडणूकीचे मतदान उद्या होत आहे. चोपडा तालुक्यातील 21 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज साहित्य वाटप करण्यात आले. 21 मतदान केंद्रांवर, एक केंद्राध्यक्ष, पाच मतदान अधिकारी व एक शिपाई असे कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात आली आहे. साहित्य वाटपानंतर मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना झाले आहेत. उद्या होणाऱ्या सूतगिरणीचे मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे. तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी च्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान पेटी बंद होणार आहे.