प्रतिनिधी, जळगाव : चोपडा शहराचे गणेश विसर्जन पाचव्या दिवशी होत असल्याने विसर्जन पूर्व संधेला पोलिसांनी मोठ्या पोलीस फौज घेऊन शहरातून रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ होऊन आझाद चौक मुस्तफा बाबा दर्गा बोहरा गल्ली मेन रोडाने गोल मंदिर अशा टाकी जामा मजीत चौकात समारोप करण्यात आला. या रूट मार्च मध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आर ए एफ ,दंगा नियंत्रण चे जवान व अधिकारी होमगार्ड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. गणेश विसर्जना वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे . नागरिकांनी उत्साहात व आनंदात तसेच शांततेत गणेश विसर्जन करावे असे आव्हान उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी केले आहे.
