जनतेज न्युज

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर एलईडी दिवे लावणाऱ्या दोषींवर कारवाई करावी – अंबादास दानवे

प्रतिनिधी, औरंगाबाद : दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तान येथील कबरीवर एलईडी दिवे लावणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.भाजपकडून या एलईडी दिवेप्रकरणी महाविकास आघाडी सरकार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेली टीका हे नादानपणाचे लक्षण असल्याचे दानवे यांनी म्हटले.एखादया दहशतवादयाच्या मरणोत्तर अशी सजावट केली जात असेल तर ती निश्चितच स्वागतार्ह नाही. त्यावेळी त्या प्रभागात भाजपच्या नगरसेविका कार्यरत होत्या. तसेच त्याच्या दफनभूमीवेळी त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का देण्यात आला? त्यावेळी हजारोंच्या संख्येने लोक तेथे जमले होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मग आम्ही त्यांना आणि भाजपला जबाबदार म्हणायचे का? आम्ही यावर टीका टिप्पणी करून राजकारण करत नाही. असे म्हणत दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. तर अशाप्रकारे दहशतवादयाचा उदात्तीकरण करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी ही आमची मागणी असल्याचे दानवे यांनी म्हटले.