जनतेज न्युज

दसरा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावरच होणार – शरद कोळी

प्रतिनिधी , सोलापूर : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावर होणार असल्याची माहिती, युवा सेनेचे राज्य विस्तार प्रमुख शरद कोळी यांनी महाराष्ट्र टाईम्सला माहिती देताना सांगितले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसल्याही परवानगीची गरज नसल्याच शरद कोळी यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरेंच्या नाव घेत शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाड फोडू अशी भूमिका शरद कोळी यांनी मांडली. शिवसैनिकांनी आजतागायत खूप सहन केलं पण आता सहन करणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असा इशारा युवा सेना राज्य विस्तारक प्रमुख कोळी यांनी विरोधकांना दिला आहे. राज्यातील युवा सैनिकांनी व शिवसैनिकांनी मुंबईला हजर व्हायचं आहे, असेही आवाहन शरद कोळी यांनी केले आहे.