प्रतिनिधी, अहमदनगर : सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच महाविद्यालयात येणाऱ्याअधि अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या पाहून आपणही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली तर नक्कीच प्रशासकीय अधिकारी बनू अशी मनाशी खुणगाट बांधत संगमनेरच्या कल्याणी ने एम पी एससीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली अन पहिल्या प्रयत्नातच तिने यश मिळवत ती थेट सहाय्यक अभियंता श्रेणी १ या पदावरजाऊन पोहोचली आहे.संगमनेर शहरातील अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर असणाऱ्या संजय गांधी नगर या परिसरात श्रीमती संगीता मोहन अहिरे ही कल्याणी व नवनाथ या आपल्या दोन मुलांसह छोट्याशा घरात राहत आहे. दोन्ही मुले लहान पणापासून हुशार होती या दोन्ही मुलांचे संगी ताने दुसऱ्याच्या घरी जुनी भांडी करूनशिक्षण पूर्ण केले त्याचवेळी आपल्या आईचे होणाऱ्या हाल लक्षात घेता कल्याणी जिद्दीला पेटली आणि तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉले जमध्ये सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षणघेतले सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांच्या महाविद्यालयात अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या येत होत्या त्यावेळी आपण सुद्धा एक दिवस या शासकीय अधिकाऱ्यांसारखे प्रशासनातील अधिकारी बनून अशा शासकीय गाड्यांमध्ये येऊ अशी तिनी मनाशी खुणगाट बांधली अन महाराष्ट्र लोकसेवाआयो गाच्या परीक्षेची तयारी सुरू केली घरी कायम अठरा विश्व दारिद्र्य होते त्यात आई दुसऱ्या च्या घरी धुणं भांडी चे काम करत असल्या मुळे पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणे आणि शिक्षण घेणे परवडणारे नसल्यामुळे कल्याणीने घरीच राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तिने सहाय्यक अभि यंता पदासाठी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली या परीक्षेचा निकाल कानी पडताच तिच्याआईला व तिच्या भावाला आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
