जनतेज न्युज

दिंडोरी भागात झालेल्या धाडसी दरोड्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा..!

प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या ढकांबे मानोरी शिवारातील रतन बोडके यांच्या शिवकमल बंगल्यात धाडसी दरोडा टाकण्यात आला होता.पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर दरोडेखोरांनी बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ८ लाख ५० हजार असा मुद्देमाल चोरून नेला होता.याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी या दरोड्याची उकल करण्यासाठी पथक तयार केली होती.गुन्हे शोध पथक अधिकारी आणि कर्मचारयांनी दरोडे खोरांचे वर्णन घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि गुप्त बतमीदारा मार्फत माहिती घेऊन नाशिक पुना रोड येथील पंचशील झोपडपट्टी येथून संशयित नौशाद आलम फजल शेख एक ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता,त्याने संशयित राहुल नगर ,जेलरोड येथे राहणार रहेमान फझल शेख,जेल रोड,राजराजेश्वरी मंगल कार्यलय शेजारी राहणारा इरशाद नईम शेख, मध्यप्रदेशच्या रसलपूर,जिल्हा देवासा येथील राहणारे लखन बाबूलाल कुंडलिया,रवी उर्फ लालू देवीलाल फुलेरी,इकबाल खान फारुख खान आणि मध्यप्रदेश इंदोर येथे राहणारा भुरा उर्फ पवन रतन फुलेरी यांनी मिळून हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.तर या गुन्ह्यातील दोघा संशयितांना पुणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत त्यांच्यांडून या गुन्ह्यातील १६ तोळे वजनाचे सोन्याचे ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर या गुन्ह्यातील संशयित आरोपींवर धुळे,औरंगाबाद,पुणे,नाशिक आणि मध्यप्रदेशात दरोडे,जबरी चोरी,चोरी अश्या प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांच्या कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना आहे…