प्रतिनिधी , बुलडाणा : महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासुन भारतीय जनता पार्टीचा जळफळाट होत आहे.प्रत्येक बाबतीत शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न ते करत आहेत.मागच्या काळात असा त्यांनी CID चा उपयोग केला. मात्र CID चे अधिकार आता राज्य सरकारकडे गेल्या मुळे त्यांना दुसरा पर्याय उरला नाही.म्हणुन त्यांनी सरनाईक साहेबांच्या घरी छापा टाकला.त्यांचा तो रिपब्लिक टीवी चा चमचा अर्नब गोस्वामी याच्यावर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.आणि त्याच्यावर करावाही चालु आहे.ह्या सगळ्या गोष्टी भाजपाला सहन झाल नाही.म्हणुन केवळ बदनाम करण्यासाठी ED छापा झाला आहे.आणि त्यांचा डाव हा त्यांच्यावरच ऊलटेल अशी प्रतिक्रिया बुलडाणा विधानसभेचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
