जनतेज न्युज

गणेश उत्सवा निमित्त वाळूज महानगरातील बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ शिगेला

प्रतिनिधी, औरंगाबाद : कोरोनाच्या काळानंतर प्रदीर्घ दोन वर्षानंतर गणेश उत्सव, धुमधडाक्यात साजरा करता येणार असल्याने वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगरातील मोहटादेवी चौकातील बाजारपेठेतील दुकाने परिसरातील नागरिकांच्या वर्दळीने चांगलीच गजबजलेली पाहायला मिळत आहेत सजावटीचे साहित्य, गणेश मूर्तींची खरेदी,तशेच गणरायाला लागणाऱ्या पुजेच्या साहित्य खरेदी करण्यासाठी या गजबजलेल्या बाजारपेठेत कामगार वर्ग मोठ्या उत्साहाने खरेदी करत असल्याने सण-उत्सव सोहळ्यावर व्यवसाय अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना विघ्नहर्त्याच्या आगमनाने चांगलीच आर्थिक उभारी मिळत आहे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची विक्री होत असल्याने मूर्ती व्यवसायिकांना ,तसेच सण उत्सव सोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांना विघ्नहर्त्याचे आगमन चांगलीच आर्थिक उभारी देत आहे