जनतेज न्युज

गणेशोत्सवावर महागाईचे सावट; गणेश मूर्तीसह सर्वच वस्तुंची २० ते २५ टक्के दरवाढ

प्रतिनिधी, सांगली : कोरोनामुळे दोन वर्ष खसला गणेशोत्सव यावर्षी जोरात साजरा होत आहे. मात्र गणेशोत्सवात लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉलही उभे महागाईचे सावट आहे.गणेशोत्सवासाठी मूर्तीसह सजावटीचे साहित्य दरात किमान २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. याची सामान्यांना झळ बसणार आहे.कोरोनामुळे सण, उत्सवावर निर्बंध होते. यावर्षी सणावरील सर्व निर्बंध शासनाने उठविले आहेत. यामुळे गणेशोत्सव धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीस सुरुवात केली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र शासनाने सर्वच वस्तूंवर जीएसटी लादल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्याचाही उत्सवावर परिणाम होणार आहे. यावर्षी गणपती मूर्तीच्या किंमती २० ते २५ टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत. सजावटीसाठी लागणारे साहित्य, मिठाई यासह सर्वच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवावर काहीसे महागाईचे सावट जाणवू लागले आहे.