जनतेज न्युज

ग.स सोसायटीच्या सभेत राष्ट्रगीतचा अपमान

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीची आज जळगावात ११३ वि वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात अवघ्या १० मिनिटात आटोपती घेण्यात आली. यावेळी राष्ट्रगीताचाही अवमान झाल्याचे दिसून आले. ग.स. सोसायटीची सभा आज दुपारी दीड वाजता नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. ग.स सोसायटी ची सभा आज नूतन मराठा येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी विरोधकांनी काही बाबींचा विरोध करतांना ….यादरम्यान राष्ट्रगीत सुरू करण्यात आला मात्र या गोधळात राष्ट्रगीताचा अपमान करण्यात आलअध्यक्ष उदय पाटील यांनी प्रास्ताविक मांडल्यानंतर १३ विषयांना मंजुरी देत असतांना ६ व्या विषयांचे वाचन सुरु असताना काही सभासदानी या विषयाला आक्षेप घेत आक्रमक होऊन त्यांनी सभेत हुज्जतबाजी घालण्यास सुरुवात केली .यावेळी काही सभासदांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने गोंधळात भर पडली . तर काही सभासदांनी २० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्याने वातावरण चांगलेच तापले. मात्र सभासद हे जुमानत नसल्याने संचालक मंडळाने सर्व विषय अवघ्या १० मिनिटात मंजूर करीत राष्ट्रगीताला प्रारंभ करण्यात आला . मात्र गोंधळाच्या वातावरणात राष्ट्रगीत अपूर्ण म्हटले गेल्याने याठिकाणी अवमान झाला. सभेनंतर माध्यमांशी संवाद साधतांना अध्यक्ष उदय पाटील यांनी तिन्ही गटांची युती झाली असतांना ग.स. सोसायटीच्या सभेत सभासदांनी गोंधळ घातला हि घटना २००६ रोजी झालेल्या वार्षिक सभेसारखी झाली असल्याचा खुलासा केला. राष्ट्रगीताच्या अवमानाबद्दल बोलताना त्यांनी सभेत पोलीस बंदोबस्त होता. त्यांच्यासमोर हि वाईट घटना घडली असून त्यांनीच कारवाई करावी असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान काल झालेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही गटांचे नेते आणि संचालक व्यासपीठावर एकत्र आले असताना आज झालेल्या वार्षिक सभेत गोंधळ कसा झाला याची चर्चा रंगली होती.