प्रतिनिधी , सांगली : सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानचा गणेश विसर्जनाचा सोहळा आज मोठा उस्ताहात पार पडला. या शाही मिरवणुकीसाठी शोकडो भाविक सहभागी झाले होते. दुपारी दरबार हॉल मध्ये श्री ची आरती करण्यात आली. आरती नंतर मिरवणुकीला सुरवात झाली. संस्थांच्या या गणेशोत्सवाला दोनशे वर्षाची परम्परा आहे. आजच्या गणेश विसर्जनाचा सोहळ्याला राजे विजयसिह पटवर्धन, राणी राजलक्ष्मी पटवर्धन उपस्थित होत्या. अगोदर महापूर आणि नंतर करोना यामुळे मागील तीन वर्ष सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. श्री गजानन हें सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी १८०१ सांगली मध्ये गणेशदुर्ग राजवाडा आणि प्रसिध्द गणपती मंदिराची उभारणी केली. तेव्हा पासून सांगली मध्ये गणेश उस्तव सुरु आहे. याठिकाणी पाच दिवस गणपती आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सोहळ्या साठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाचा पावणारा गणपती आहे. शाही रथातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत घोडे, पारंपारिक वेशभूषा धारण केलेले मावळे , लेझीम , हलगी, भजन, टाळकरी, झांजपथ , या सारखी पारंपारिक वाद्य यांचा समावेश होता. मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान दिले जाते.
